कुख्यात गुन्हेगार शेराचं ‘एन्काऊंटर’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील कुख्यात गुन्हेगार शेरू उर्फ शेरा उर्फ शेरसिंघ उर्फ सुरेंद्रसिंघ पि. दलबिरसिंघ उर्फ काला खैरा (24, रा. चिखलवाडी, शितळा मंदिराजवळ) हा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार मारला गेला आहे. कुख्यार गुन्हेगार शेरा याचा एन्काऊंटर आज (सोमवार) सायंकाळी पावणेपाच वाजता भोकरफाटा (ता. अर्धापूर) येथे झाला. शेरानं काल रात्री पिस्तुलाच्या धाकावर नांदेड शहरात दोन दुकानांमध्ये मोठी लुट केली होती.

शेराविरूध्द शहरातील विविध पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यांची पत्नी मुस्लिम असून ती मालटेकडी परिसरात रहावयास आहे. पिस्तुलाच्या धाकाने लुट करणारा शेरा पसार झाला होता. त्याच्या मागावर पोलिस होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती आणि त्यांचे सहकारी शेराचा युध्दपातळीवर शोध घेत होते. शेरा हा भोकरफाटा ते बारसगाव दरम्यानच्या रस्त्यावरील शिवारात लपला असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिस पथकाने शेराकडे मोर्चा वळवला.

पोलिसांना पाहून शेराने त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देताना सहाय्यक निरीक्षक पांडूरंग भारती यांनी गोळी झाडली. त्यामध्ये शेरा गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, शेराचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले आहे. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्यासह इतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनेची माहिती घेतली आहे.

Visit : Policenama.com