पुण्यातील रहाटणीमध्ये सराफी दुकानावर दरोडा टाकणार्‍याचा एन्काउंटर !

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – रहाटणी येथील पुणेकर ज्वेलर्स येथे दरोडा टाकून ९० लाख १५ हजार रुपयांचा दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तर चारजण फरार झाले होते. फरार झालेल्या आरोपीपैकी एकाचा उत्तर प्रेदशातील मेरठ येथे एन्काउंटर करण्यात आला आहे. रविंद्र उर्फ कालिया गोस्वामी (वय-२८ रा. आदमपुरा, जि. हिस्सार) असे एन्काउंटर करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच त्याचा साथीदार अमित उर्फ शेरू याचा देखील उत्तर प्रदेश पोलिसांनी दौराला येथे सरधना रोडवर एन्काउंटर केला.

रहाटणी येथील पुणेकर ज्वेलर्स येथे ६ मार्च २०१९ रोजी दुपारी एकच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला होता. सहा जणांच्या टोळीने पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. यावेळी दिव्यांक प्रदीप मेहता यांनी प्रतिकार केला असता गुन्हेगारांनी केलेल्या गोळीबारात एक गोळी मेहता यांना लागली होती. दरोडेखोरांनी ९० लाख १५ हजार रुपयांचे ३ किलो सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या घटनेचा थररा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.

या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी सुभाष बिश्नोई आणि महीपाल जाट यांना अटक केली होती. तर त्यांचे चार साथीदार फरार झाले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २५ लाख रुपये किंमतीचे ७५५ ग्रॅम वजनाचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली पिस्टल आणि दुचाकी जप्त केली होती. वाकड पोलिसांनी त्यांच्या इतर साथीदारांचा हरियाणा उत्तर प्रदेशमध्ये शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत.

दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी रविंद्र उर्फ कालिया गोस्वामी याचा उत्तर प्रदेश पोलिसांनी मेरठ येथील दौराला सरधना रोडवर एन्काउंटर करण्यात आला. तसेच त्याचा दुसरा साथिदार अमित उर्फ शेरू याचा देखील एन्काउंटर करण्यात आला. दोघांचा एन्काउंटर करण्यात आला असल्याची माहिती हिरयाणा येथील पोलीस अधिकाऱ्यांनी वाकड पोलिसांना कळवली.

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

गर्भावस्थेत प्रवास करताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

तुळशीची पाने उकळत्या दुधामध्ये घालून त्याचा सेवन करणे ‘लाभदायक’

Loading...
You might also like