NRI उद्योगपती थंपीला ED कडून अटक, रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राबर्ट वाड्रा यांच्या विरोधात मनी लाँड्रिंग आणि शस्त्र विक्रेता संजय भंडारीच्या विदेशातील कथित अवैध संपत्तीशी संबंधित प्रकरणात ईडीनं अनिवासी भारतीय उद्योगपती सी सी थंपी याला अटक केली आहे. दुबई, लंडन आणि अन्य देशातील बेनामाी संपत्ती प्रकरणी ईडीनं वाड्रा यांची गेल्या दोन वर्षात जवळपास 13 वेळा चौकशी केली आहे. सीसी थंपी यांच्या अटकेमुळे आता वाड्रांविरोधातील प्रकरणाच्या तपासाला वेगळं वळण मिळालेलं आहे.

लंडन आणि दुबईतील मालमत्ताप्रकरणी अटक

दुबईतील स्कायलाईट कपंनी थंपीच्या नियंत्रणाखाली आहे. सॅनटॅक एफझेडई या भंडारीच्या कंपनीनं 2009 मध्ये एका खासगी कंपनीकडून लंडनमध्ये मालमत्ता खरेदी केली होती. ही मालमत्ता स्कायलाईटची होती. लंडनमधील ही मालमत्ता वाड्रा यांनी खरेदी केली होती आणि या मालमत्तेशी संबंधित वाड्रा आणि भंडारी यांच्यातील कथित मेल हे या प्रकरणातील पुरावे आहेत असा आरोप आहे.

सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. तपास यंत्रणेच्या दाव्यानुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे स्वीय सहाय्यक पी पी माधवन यांनी त्याची भेट वाड्रा यांच्याशी करून दिली होती असं थंपीनं सांगितलं आहे. कथितरित्या थंपी हाच दुबईत वाड्रा यांच्या प्रमुख संस्था चालवत आहे. यात स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी एफझेडई आणि स्कायलाईट इन्वेस्टमेंट एफझेडई यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी लंडनमध्ये मालमत्ता आणि दुबईत आलिशान बंगला खरेदी केला होता असाही आरोप केला आहे.

वाड्रांवर बेनामी संपत्ती खरेदी केल्याचा आरोप

ईडीला संशय आहे की, या सर्व बेनामी मालमत्ता या वाड्रा यांच्या आहेत. त्यांनी या मालमत्ता भाच्याच्या नावावर केल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कायलाईट इन्वेस्टमेंट झेडईएफनं कोणताही वैध व्यवहार न करता लंडनमध्ये फ्लॅट दुबईत आलिशान बंगला खरेदी करण्याआधी आपल्या खात्यात मोठी रक्कम जमा केली होती अशी माहिती विविध तपास यंत्रणांच्या चौकशीत उघड झाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like