इंजिनीअरिंग फार्मसी CET चा निकाल जाहीर, PCM ग्रुपमध्ये पुण्याची सानिका प्रथम

पुणे : अभियांत्रिकी औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पीसीएम ग्रुपमध्ये पुण्याची सानिका गुमास्ते आणि सौरभ जोग यांनी 100 पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. तर पीसीबी ग्रुपमध्ये अनिश जगदाळे याने शंभर पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत.

शनिवारी रात्री सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने निकाल जाहीर केला. यामध्ये पीसीएम ग्रुपमधील 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल तर पीसीबी ग्रुपमधील 19 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत.

ऑनलाइन पद्धतीने 37 जिल्ह्यांमध्ये 138 परीक्षा केंद्रांवर आणि महाराष्ट्राबाहेर 10 अशा 197 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी एकुण 5 लाख 42 हजार 431 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 3 लाख 86 हजार 604 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. तर, परीक्षेस 71.27 टक्के विद्यार्थी उपस्थित तर 28.73 टक्के विद्यार्थी अनुपस्थित होते. यात 1 लाख 74 हजार 679 विद्यार्थी पीसीएम ग्रुपसाठी तर 2 लाख 11 हजार 925 विद्यार्थी पीसीबीग्रुपची परीक्षा दिली होती.