दापोडी दुर्घटना प्रकरणाची द्विसदस्यीय समितीकडून चौकशी

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी येथे पाण्याच्या टाकीजवळ ड्रेनेजची वाहिनी टाकण्याचे काम करत असताना दुर्घटना घडली होती. यामध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. यात एक कामगार आणि अग्निशमन दलाच्या जवानाचा समावेश होता. या प्रकरणी आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी द्विसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. अहवालानंतर कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये अमृत योजनेअंतर्गत शहरातील मलनिस्सारण व्यवस्था व प्रकल्प राबविण्याचे काम सुरु आहे. दापोडीत काम सुरु असताना दुर्घटना घडून दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये वाचवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दालाचे जवान विशाल जाधव यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुट्टीच्या दिवशी काम करण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे प्रशासनाने पाटील कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्टक्चरला नोटीस बजावली असून संबंधीत ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.

अपघात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयुक्तांनी द्विसदस्यीय समिती स्थापन केली असून शहर अभियंता राजन पाटील आणि कार्यकारी अभियंता श्रीकांत सवने यांचा यामध्ये समावेश आहे. समितीला चौकशीसाठी आठवड्याचा अवधी देण्यात आला आहे. आयुक्त श्रावण हार्डीकर म्हणाले, दापोडी अपघात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन जणांची समिती नियुक्त केली आहे. ठेकेदारांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यांची भूमिका, जबाबदारी, सल्लागाराची भूमिका याबाबत सविस्तर चौकशी केली जाणार आहे. आठवड्यात चौकशी पूर्ण होऊन अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like