धक्कादायक ! कोरोनाच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या (Corona) भीतीने संपूर्ण कुटुंबाने विष प्राशन करून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातून (Andhra Pradesh) समोर आली आहे. कर्नुल शहरातील वड्डेनगरी भागातील चार जणांच्या कुटुंबाने आत्महत्या केली. बुधवारी (दि. 23) सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट (Suicide note) सापडली असून त्यात त्यांनी आत्महत्येचे कारण कोरोनाची भीती असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मित्राचा आणि नातेवाईकांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची भीती सतावत होती. या भीतीनेच या कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

प्रताप (वय 42), हेमलता (36), जयंत (17) आणि रिशिता (14) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. यात प्रताप हा टीव्ही मेकॅनिक होता. जयंत एक कोर्स करत होता. तर रिशिता सातवीमध्ये शिकत होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य बुधवारी सकाळी घराबाहेर
दिसला नाही. तसेच घराचा दरवाजाही उघडला नाही. त्यामुळे शेजारच्यांना संशय आला. त्यांनी दार
वाजवल्यानंतरही काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर पोलिसांना बोलवण्यात आले.
पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना चौघांचे मृतदेह आढळून आले. दरम्यान
आंध्र प्रदेशात आतापर्यंत 18, 54457 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी 53, 880 ही
अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या आहे. तर राज्यात 12,416 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हे देखील वाचा

 

Fake Call Centre Mumbai | मुंबईत 2 बनावट कॉलसेंटरवर छापे, दोघांना अटक

कोरोनाच्या संपूर्ण कुटुंबाचा ‘खात्मा’ करणार ‘ही’ व्हॅक्सीन ! पुढील वर्षी होऊ शकते मनुष्यावर ट्रायल

Thackeray Government | ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे छगन भुजबळ संतापले, म्हणाले…

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : entire family committed suicide fearing corona virus in andhra pradesh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update