EPF Account | 1 एप्रिलपासून ईपीएफ खात्यावर लागू होणार कर; जाणून घ्या सविस्तर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPF Account | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफ आहे. कर्मचाऱ्यांना लाभदायक, सुरक्षित अशी योजना असते. कर्मचाऱ्यांची बचत, निवृत्तीनंतर आपला प्लान काय असणार. सध्या हे करपात्र आहे. आजतागायत EPF च्या योगदानावर अथवा त्यामधून मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर लागत नव्हता. मात्र, 2021 अर्थसंकल्पीय दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी घोषणा केली होती. यानुसार नियमात बदल केला आहे. याबाबत माहिती (EPF Account) जाणून घ्या.
अडीच लाखांवरील योगदानावर मिळणारे व्याज करपात्र असेल. पंरतु, या नियमाला मोठा विरोध झाला. सरकारनेही याचा आढावा घेतला. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने गतवर्षी 31 ऑगस्टला एक परिपत्रक जारी केले आहे. तसेच, EPF वरील कराच्या नवीन नियमांबाबत माहिती दिलीय. पण अजुन अंमलबजावणी झाली नाही. 1 एप्रिल 2022 पासून हे नियम लागू (EPF Account) केले जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
जर एखादा कर्मचाऱ्याने आपल्या प्रोविडेंट फंडमध्ये (PF) एका आर्थिक वर्षात अडीच लाखांपेक्षा अधिक योगदान दिले असल्यास त्यावर मिळणारे व्याज करपात्र असेल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, प्रोविडेंट फंडमध्ये जर कोणी तीन लाख गुंतवले असतील तर अतिरिक्त मिळणाऱ्या 50 हजारांवर कर लागू होणार आहे. असं वित्त कायदा 2021 (Finance Act 2021) मध्ये नवीन तरतूदीत म्हटलं आहे.
EPF मध्ये कंपनीचे कोणतेही योगदान नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही मर्यादा अडीच लाख रुपयांवरून पाच लाख रुपये केली जाईल. तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीही (Central Staff) ही मर्यादा पाच लाख रुपये असणार आहे.
‘ईपीएफ’चे 2 खाते कसे मिळवायचे ?
आता भविष्य निर्वाह निधीमध्ये 2 खाते तयार केले जातील. पहिले खाते करपात्र (Taxable) असेल तर दुसरे करपात्र नसलेले खाते. सीबीडीटीने यासाठी नियम 9 डी अधिसूचित केला आहे. यात EPF योगदानावर मिळणाऱ्या व्याजावर कर मोजला जाईल. 9 डी या नवीन नियमामुळे करपात्र व्याज कसे मोजले जाईल, तसेच दोन खाती कशी व्यवस्थापित करायची आणि कंपन्यांना काय करावे लागेल, याची माहिती समोर येते.
—
करपात्र खाते –
यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये, एखाद्याच्या EPF खात्यात अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केल्यास, अतिरिक्त रकमेवर मिळणारे व्याज कराच्या कक्षेत येईल.
यावरील मोजणीसाठी उर्वरित पैसे करपात्र खात्यात जमा केले जातील.
त्यात मिळणाऱ्या व्याजावर कर कापला जाईल.
करपात्र नसलेले खाते –
समजा एखाद्याच्या ईपीएफ खात्यात 5 लाख रुपये जमा असतील,
तर नवीन नियमानुसार, 31 मार्च 2021 पर्यंत जमा केलेली रक्कम करशिवाय खात्यात जमा केली जाईल.
यावर कोणताही कर आकारला जाणार नाही.
ईपीएफ वर कर कसा मोजला जाईल ?
समजा ईपीएफ खात्यात 31 मार्च 2021 पर्यंत 5 लाख रुपये असतील.
आर्थिक वर्षात तीन लाख रुपयांचे योगदान असेल.
तीच रक्कम कंपनीच्या वतीने खात्यात जमा केली, तर त्याच करपात्र आणि अकरपात्रावरील कराचा हिशोब काहीसा असा असेल.
Web Title :- EPF Account | epf new rule interest income taxable updates
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update