Pune Crime | CA च्या परीक्षेत दोनवेळा अपयश, नैराश्यातून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सीएची (सनदी लेखपाल) दोन वेळा परीक्षा (CA Exam) देऊनही यश न आल्याने नैराश्यातून एका तरुणीने राहत्या घरात गळफास (Hanging) लावून घेत आत्महत्या केल्याची (Suicide in Pune) धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात (Pune Crime) घडली आहे. पल्लवी संजय जाधव Pallavi Sanjay Jadhav (वय-24 रा. केशवनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी जाधव ही तरुणी सीएचा अभ्यास करीत होती. त्यासाठी तिने दोन वेळा परीक्षा दिली. मात्र, दोन्ही वेळेस तिला अपयश आले. पल्लवीने तिसऱ्यांदा परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून निकाल जाहीर झाल्यापासून ती घरातील कोणत्याच व्यक्तीसोबत बोलत नव्हती. (Pune Crime)

 

आज (शुक्रवार) सकाळी पल्लवीने केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. परीक्षेत पुन्हा अपयश आल्याने तिने नैराश्यातून (Depression) हे टोकाचे पाऊल उचलले असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात (YCM Hospital) पाठवला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | suicide of Pallavi Sanjay Jadhav due failure in ca exam pimpri chinchwad of pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Hemant Rasne | सदाशिव-शनिवार आदर्श प्रभागासाठी प्रशासकीय जबाबदारी निश्चित; स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

 

Foods That Trigger Migraine | गोड पदार्थ आणि चॉकलेटने वाढते मायग्रेनची वेदना, ‘या’ 8 गोष्टींपासून रहा दूर, जाणून घ्या

 

Mayor Murlidhar Mohol | राज्य शासनाने शिवजयंतीला मिरवणूकीची परवानगी द्यावी; महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘सर्व मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्याची व्यवस्था’

 

Pune Crime | वृद्धापकाळात आधारासाठी ‘स्थळ’ पाहणार्‍या 81 वर्षाच्या निवृत्त लष्करी अधिकार्‍याची फसवणूक; विवाह संस्थांच्या 3 महिलांविरूध्द गुन्हा दाखल