काय आहे इसोफेगल एट्रोसिया किंवा ट्रॅचियोइसोफेगल फिस्ट्युला ? जाणून घ्या लक्षणांसहित सविस्तर माहिती

इसोफेगल एट्रोसिया किंवा ट्रॅचियोइसोफेगल फिस्ट्युला काय आहे ?

हा इसोफेगसचा एक विकार आहे. एक लांब ट्युब जी तोंडाला आणि पोटाला जोडते तिला इसोफेगस म्हणतात. इसोफेगल एट्रेसिया (EA) हा एक जन्मजात विकार आहे. यात इसोफेगल ट्युबच्या विकासात व्यत्यय येतो.

ट्रॅचियोइसोफेगल फिस्ट्युला (TF) सहसा नवजात बालकांत दिसून येतो. हा श्वसननलिकेसोबत इसोफेगसच्या असामान्य जोडणीचा दोष आहे. ट्रॅची (श्वसननलिका) ही सामान्यपणे इसोफेगसच्या खालच्या भागाशी जोडलेली असते. ही जोडणी वरच्या भागात किंवा इसोफेगसच्या दोन्ही भागात आढळू शकते.

काय आहेत इसोफेगल एट्रोसिया किंवा ट्रॅचियोइसोफेगल फिस्ट्युलाची लक्षणं ?

– खोकला येणं
– अन्न घालण्याचा प्रयत्न केल्यास गळ्यात अडकणं
– जेवण भरवण्याचा प्रयत्न केला तर सायोनसिसमुळं त्वचा निळी पडणं
– तोंडातून अनियंत्रित लाळ पडत राहणं
– वजन न वाढणं
– उलट्या
– असामान्य गोल पोट

काय आहेत याची कारणं ?

तसं तर याची कारणं अद्याप अज्ञात आहेत. परंतु तज्ज्ञ सांगतात की, काही जन्मदोष EA आणि TF शी संबंधित असू शकतात.

– व्हेंट्रीक्युलर सेप्टल डिफेक्ट सारखे हृदय दोष
– पॉलिसिस्टीक किडनीसारखे मूत्रमार्गाचे दोष
– ट्रायसोमी 13, 18 किंवा 21
– मस्क्युलोस्केलेटल विकार

काय आहेत यावरील उपचार ?

दोन्ही दोषांसाठी शस्त्रक्रिया हा उपचार आहे. बाळास भविष्यात इसोफेगेल समस्या उद्भवू शकते. उदा वण आलेले उतक (स्कार टिश्यू). यासाठी बाळ मोठं झाल्यानंतर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करावी लागते. इतर काही समस्या डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधानं नियंत्रित केल्या जातात.