कधी काळी Big B अमिताभची हिरोईन होती ‘रामायण’मधील ‘कैकई’ !

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या दूरदर्शनवर रिपीट टेलीकास्ट केला जाणारा रामानंद सागर यांचा शो रामायण हा 80 च्या दशकातली शो आहे. आजही यातील प्रत्येक पात्र हे यादगार आहे. तरुण वर्गातही रामायणबद्दल मोठी क्रेज पहायला मिळत आहे. रामायणममधील एक पात्र आहे कैकईचं. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे पद्मा खन्ना.

पद्मा खन्नानं आपल्या अभिनयानं यात जीव ओतला होता. आजही लोकांना कैकयी म्हटलं तर त्यांना पद्माचा चेहरा आठवतो. पद्मानं केवळ मालिकाच नाही तर सिनेमातही काम केलं आहे. रामायण या मालिकेत काम करण्याअगोदर तिनं अनेक सिनेमात काम केलं आहे.

पद्मानं भोजपुरी सिनेमातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. आपल्या अॅक्टींगच्या जोरावर तिला बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चनसोबत काम करण्याचीही संधी मिळाली आहे. पद्माला जॉनी मेरा नाम या सिनेमात मोठा ब्रेक मिळाला होता. यानंतर ती अनेक सिनेमात काम करताना दिसली. 1973 साली आलेल्या अमिताभ बच्चन आणि नूतन स्टारर सौदागर या सिनेमातही पद्मानं महत्त्वाची भूमिका साकारली होती.

पद्मान वेगवेगळ्या भाषेतील शेकडो सिनेमे केले आहेत. जास्त करून तिला डान्सरच्या रुपातच सिनेमे मिळाले आहेत. यात लोफर, जान ए बहार, पाकीजा अशा सिनेमांचा समावेश आहे ज्यात पद्मा डान्सरच्या भूमिकेत दिसली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like