ईव्हीएमची माहिती दहा रुपयात

नवी : दिल्ली वृत्तसंस्था – ईव्हीएम मशीन माहिती अधिकार कक्षेत असल्याचे केंद्रीय माहीती आयोगाने स्पष्ट केले आहे. आता कोणालाही केवळ दहा रुपये भरून कोणत्याही निवडणूक आयोगाकडून यासंदर्भातील माहितीची मागणी करता येऊ शकते. असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाकडे रजाक खान हैदर यांनी ईव्हीएम संदर्भात माहिती मागणारा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला होता. तो अर्ज आयोगाने ईव्हीएम माहितीच्या संज्ञेखाली येत नसल्याचे सांगत फेटाळला होता. त्यानंतर हैदर यांनी केंद्रीय माहिती आयोगाकडे धाव घेतली. त्यावेळी निवडणूक आयोगाकडे येणाऱ्या अर्जावर निवडणूक आयोगाला उत्तर द्यावे लागेल किंवा कायद्यानुसार तो नाकारावा लागेल. तसेच त्याला माहिती आयोगासमोर आव्हान देता येणार आहे. ईव्हीएमचा माहिती या संज्ञेखाली समावेश असून त्याविषयी माहिती निवडणूक आयोगाकडे मागता येईल. असा महत्वपुर्ण निर्णय मुख्य माहिती आयुक्त सुधीर भार्गव यांनी दिला आहे.

तसेच माहिती कायद्याच्या कलम २ एफ आणि २ आयनुसार माहिती, दस्त व्याख्येमध्ये कोणतेही यंत्र किंवा नमुन्यांचा प्रकार येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याच कलमानुसार माहिती नाकारणे चुकीचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.