शिवसेना Vs भाजप : मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट लिहणाऱ्या ‘तिवारी’च्या समर्थनार्थ किरीट सोमय्या मैदानात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वडाळ्यात मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट लिहिणाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली आहे. मुंबईतील वडाळाभागात राहणाऱ्या हिरामणी त्रिपाठी व्यक्तीने फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात फेसबूक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर हिरामणी त्रिपाठीला गाठून शिवसैनिकांनी चोप दिला. एवढेच नाही तर त्याचे मुंडण देखील केले. त्यानंतर आता तिवारीच्या समर्थनार्थ भाजप नेते किरीट सोमय्या उतरले आहे. त्यामुळे भाजप विरोध शिवसेना असे वातावरण तापण्याची शक्यता आहे.

आज भाजप नेते किरीट सोमय्या वडाळ्यात दाखल झाले आहेत. त्यानंतर शिवसैनिक देखील वडाळ्यात जमले आहे. तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा फौजफाटा लावला आहे. सोमय्यांबरोबर वडाळ्यातील स्थानिक आमदार आणि कार्यकर्ते जमण्यात सुरुवात झाली आहे.

यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की हे गुंडांच सरकार, जनतेला दिलासा देण्याचे आमचे काम आहे. यामुळे आता शिवसैनिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जामिया विद्यापीठाच्या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकाडांशी केली होती. त्यावर भाष्य करणारी आणि विरोधी पोस्ट हिरामणी याने फेसबुकवर केली होती. ही पोस्ट 22 डिसेंबरला करण्यात आली होती. या पोस्टवर सोशल मिडियावर देखील बराच आक्षेप घेण्यात आला होता.

दरम्यान या पोस्टमुळे वाद उफाळू नये म्हणून वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी परिसरात जमावबंदीची नोटीस जारी केली आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/