देशात पहिल्यांदाच पोलीस कर्मचारी करणार स्केटिंगचा ‘हा’ विक्रम

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  जळगाव जिल्हा पोलिस दलात पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक राष्ट्रीय खेळाडू विनोद पितांबर अहिरे 1 डिसेंबर 2019 रोजी आपल्या आयुष्याची 40 वर्षे पूर्ण करीत असून ते 40 व्या वाढदिवशी 40 किलोमीटर स्केटिंग करून आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. सदर कार्यक्रमाचे आयोजन पॅंथर स्पोर्ट्स असोशियन तर्फे स्केटिंग खेळाडूंनी जळगाव येथील बहिणाबाई गार्डन येथे दिनांक 1 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 09:00 वा. आयोजित केले आहे. समाजामध्ये पोलिसांबद्दल असा गैरसमज आहे की पोलीस दलात भरती झाल्यावर काही वर्षातच पोलिसांची ढेरी सुटून ते स्थूल होऊन जातात. या कल्पनेला छेद देण्यासाठी विनोद अहिरे यांनी 40 किलोमीटर स्केटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

याअगोदर महामार्गावर सलग स्केटिंग करायचे त्यांचे ठरले होते परंतु महामार्गाचे काम सुरू असल्याने ते शक्य होणार नाही म्हणून बहिणाबाई गार्डन येथील पाचशे मीटर वॉकिंग ट्रकवर ते ते आपलं 40 किमी अंतर पूर्ण करणार आहेत. या ग्राऊंडवर त्यांना एकूण 80 राऊंड मारावे लागणार आहे. सकाळी 9.30 वाजता ते आपल्या स्केटींगला सुरुवात करणार आहेत.

अशा अनोख्या पद्धतीने 40 व्या वर्षी 40 किलोमीटर स्केटिंग करणारे ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर कदाचित भारतातील पहिले पोलीस ठरण्याची शक्यता आहे अशी माहिती पॅंथर असोशिएनच्या वतीने स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव श्री कन्हैयालाल यांनी दिली आहे.

Visit : Policenama.com