Expansion Of Pune Railway Station | पुणे रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण सुरू; प्राथमिक टप्पा पूर्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Expansion Of Pune Railway Station | पुणे शहर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनचा विस्तार करण्याची गरज आहे. प्रवाशांच्या सोयीचा विचार करुन पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्ताराला मंजुरी देण्यात आली आहे. विस्तारीकरणाआधीचे प्राथमिक टप्प्यावरील काम वेगाने सुरू झाले आहे. प्राथमिक टप्प्याचे काम 30 टक्के पूर्ण झाले असून, त्यासाठी 51 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरुवात केली जाणार आहे. या विस्तारामध्ये काही प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे अशी कामे केले जाणारी आहे. (Expansion Of Pune Railway Station)

पुणे रेल्वे स्टेशनच्या विस्ताराच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 2,3 आणि 6 ची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे या संबंधित प्लॅटफॉर्मवर 24 एलएचबी डबे आणि 26 आयसीएफ डब्यांच्या गाड्या थांबू शकणार आहेत. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक तीनचे गाडी जाण्याच्या मुख्य मार्गामध्ये आणि प्लॅटफॉर्म क्रमांक चारचे गाड्या जाण्याच्या मुख्य मार्गामध्ये रुपांतर केले जाणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 च्या मध्ये मालवाहू गाड्यांसाठी दोन वेगळे मार्ग तयार केले जातील. (Expansion Of Pune Railway Station)

पुणे रेल्वे स्टेशनच्या या विस्तारीकरणामध्ये सध्या सिग्नल यंत्रणेचे काम सुरू करण्यात आले आहे.
तसेच रिले रूमसाठी वेगळी व्यवस्था निर्माण केली जात आहे. यामध्ये मार्ग क्रमांक 6 आणि 8 चे मुंबईच्या बाजूचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. तिथे लोहमार्गांचे काम सुरू असून, ओव्हरहेड वायरचे कामही लवकरच सुरू होणार आहे. प्राथमिक टप्प्यावरील काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू होईल. त्यासाठी दिवाळीनंतरचा मुहूर्त निघण्याची शक्यता आहे. विस्तारीकरणाचे काम 107 दिवसांत पूर्ण करुन प्रवाशांना लवकरात लवकर सेवेसाठी खुले करुन देण्याचे नियोजन रेल्वेचे आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | दंड माफ करण्यासाठी लाच घेताना महावितरणचा कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

ACB Trap Case | ग्रॅज्युटीच्या फरकाची रक्कम देण्यासाठी लाच घेताना उपकोषागार अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला गुन्हे शाखेकडून अटक, 5 गुन्हे उघडकीस