home page top 1

पुण्यात ‘हायप्रोफाईल’ सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 5 विदेशी तरूणी ‘टूरिस्ट’ व्हिसावर येऊन करत होत्या भलतच ‘काम’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव पार्कमधील जिवांका स्पा येथे मसाजच्या नावाखाली चालत असलेल्या वेश्याव्यवसायाचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. स्पामालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. गोपाल रमेश मिश्रा (वय २३, रा. रामनगर, येरवडा) असे स्पा मालकाचे नाव असून कोरेगाव पार्क पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाला याबाबत माहिती मिळाली की, अशोका मॉलमधील जिवांका स्पा मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करुन घेतला जात आहे. त्यानंतर पोलीसांनी या स्पावर बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर छापा घालण्यात आला. त्यात ५ परदेशी तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याचे आढळून आले. या परदेशी तरुणी टुरिस्ट व्हिसावर आलेल्या होत्या. स्पामालकाला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सहकारनगर येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी कारवाई करुन एका महिलेला ताब्यात घेतले असून एका तरुणीची सुटका केली आहे.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like