इतकी संपत्ती जवळ ठेवण्याचा मला अधिकार नाही, 70 अरब डॉलरचा मालक झुकेरबर्ग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुकचा सहसंस्थापक, चेअरमन आणि सीईओ मार्क झुकेरबर्गने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एका मीटिंगचे आयोजन केले होते. यामध्ये जगातील पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती असलेल्या मार्कने आपल्या संपत्तीबाबत घोषणा केली आहे. 70 अरब डॉलर इतक्या संपत्तीचा मालक असलेल्या झुकेरबर्गने यावेळी म्हटले कि, इतक्या जास्त प्रमाणत संपत्ती जवळ ठेवण्याचा मला कोणताही अधिकार नाही.

त्याचबरोबर इतक्या मोठ्या पदावर गेल्यानंतर कुणाकडेही इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे ठेवण्याचा अधिकार नसावा, असेही त्याने म्हटले आहे. आपल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्याने आपल्या संपत्तीबाबत जाहीरपणे विधान केले आहे. तसेच त्याने या मीटिंगमध्ये विविध विषयांवर आपल्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देखील केले.

कमाईचा मोठा भाग दान करणार
झुकेरबर्ग याने बोलताना म्हटले कि, मी आणि माझी पत्नी प्रेसीलिया चान यांनी आमच्या संपत्तीतील काही हिस्सा आम्ही दान करण्याचे ठरवले आहे.

टिकटॉकला इंस्टाग्रामपेक्षा मोठे मानतो
काही दिवसांपूर्वी झुकेरबर्ग याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये तो चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकला इंस्टाग्रामपेक्षा मोठे म्हणत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये त्याने टिकटॉक हे भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असल्याचे देखील म्हटले आहे.

Visit : Policenama.com