खुशखबर ! आता फेसबुक मेसेंजरनेही करता येणार हॉटेलचं बुकिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुक आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स ॲड करत आहे. आता लवकरच फेसबुक मेसेंजरमध्ये ‘अपॉइंटमेंट’ हे नवं फीचरही लाँच होणार असून याच्या मदतीने हॉटेलचं बुकींग करता येणार आहे. सध्या या अ‍ॅप चाचणी सुरू असून या वर्षाच्या शेवटी हे लाँच करण्यात येईल.

यापूर्वी फेसबुकचा वापर चॅटींग आणि पोस्ट टाकण्यासाठी होत होता. त्यानंतर आता फेसबुकने आपली व्याप्ती वाढवण्यास सुरुवात केली आहे. फेसबुक बिजनेससाठी मेसेंजरचा उपयोग आणखी रंजक बनवण्यावर फेसबुक भर देत आहे. फेसबुकने शॉपिंगसाठी इन्स्टाग्रामवर निवडक ब्रँडच्या उत्पादनाची खरेदी करण्याची सुविधा आणली असताना आता हॉटेलचं बुकींग करता येईल असे ‘अपॉइंटमेंट’ फीचर लाँच करण्याची तयारी केली आहे. फेसबुक मेसेंजरमध्ये लवकरच नव्या स्वरूपात जाहिराती झळकतील ज्याचा उपयोग व्यावसायिकांना उत्तम प्रकारे करून घेता येणार आहे. अपॉइंटमेंट हे नवं फीचरसुद्धा यामध्ये अ‍ॅड होणार आहे. ज्यात कोणत्याही हॉटेल मालकाशी बोलून तुम्हाला हॉटेलचं बुकींग करता येणार आहे.

फेसबुकचे नवीन फीचर –
तसेच फेसबुकच्या अ‍ॅन्युअल डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये अनेक फीचर्ससह फेसबुक मेसेंजरचं डेस्कटॉप व्हर्जन लाँच करणार असल्याची घोषणा फेसबुकने केली आहे. फेसबुक मेसेंजरचं डेस्कटॉप व्हर्जनसोबतच group viewing नावाचं आणखी एक फीचर यात येणार आहे. मित्रांसोबत व्हिडीओ बघण्यासाठी या फीचरचा वापर करता येणार आहे. तसेच हा व्हिडीओ सुरू असताना तुम्ही संभाषण देखील करू शकाल. कोणता व्हिडिओ प्लॅटफॉर्म या फीचरला सपोर्ट करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र यावर काम करत असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे.

You might also like