WhatsApp सारखं फीचर आता FB मेसेंजरमध्ये, जाणून घ्या फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   वॉट्सअ‍ॅप्प हे भारतात सर्वात जास्त जास्त वापरलं जाणारं मेसेंजर ऍप आहे. वॉट्सअप्प नेहमी काहीतरी अपडेट करत असतं.म्हणून ते खूप प्रसिद्ध आहे. आता वॉट्सअप्प सारखंच फेसबुक मेसेंजरने एक नवीन फीचर आणणार आहे. या फिचरमुळे आता आपण फेसबुक मेसेंजरवर एकावेळी केवळ पाच लोकांनाच संदेश फॉरवर्ड करू शकतो.

वॉट्सअप्पने 2018 साली हे फॉरवर्डवर मर्यादा असणारं फिचर आणलं होतं. आता फेसबुकनेही मेसेंजरमध्ये असेच एक फिचर आणण्याची घोषणा केली आहे. या फिचरचा खूप महत्त्वाचा उपयोग असून यामुळे फेक न्युज व्हायरल होण्यावर काही प्रमाणात बंधनं येणार आहेत.

व्हायरल मिस इन्फॉर्मेशन आणि हार्मफुल कन्टेन्ट कमी करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे असे कंपनीला वाटते. वॉट्सअप्प वरचा हा प्रयोग खूप यशस्वी झाला आहे. वॉट्सअपला फॉरवर्डची मर्यादा ठरवल्यानंतर अशा संदेशांमध्ये 70% ड्रॉप म्हणजे कमी झाल्याचे नोंदविण्यात आल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

फेसबुकवर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘आम्ही फेसबुक मेसेंजरमध्ये फॉरवर्ड मर्यादा सादर करीत आहोत. मेसेंजरवर कुटुंब आणि मित्रांसह संपर्कात राहण्यासाठी आपल्या सर्वांना एक सुरक्षित प्लॅटफॉर्म हवा आहे, यासाठीच आम्ही हे बदल करत आहोत, अशी माहिती फेसबुकने दिली आहे.