‘त्याला’ व्हायचं होतं ‘ती’ पण लिंग बदल ‘सर्जरी’ झाली ‘फेल’, उचललं हे पाऊल अन् सर्वत्र ‘खळबळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंदौरमधील एका व्यक्तीने महिला बनण्यासाठी सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी केली होती. परंतु नैराशातून या व्यक्तीने शनिवारी रात्री आत्महत्या केली आहे अशी माहिती मध्यप्रदेश पोलिसांकडून देण्यात आली.

उपनिरीक्षक सुरेश बुनकर यांनी सांगितले की पलक तिवारी (वय 26), हीने रोहित या व्यक्तीशी 4 महिन्यांपूर्वी मंदिरात एका विवाह केला होता आणि त्या व्यक्तीसोबतच राहत होती, परंतु तिने शनिवारी रात्री चंदन नगर भागात फाशी घेऊन आत्महत्या केली. पलक त्या व्यक्तीबरोबर मागील 8 वर्षापासून नात्यात होती. तिने लग्नासाठी आणि शारीरिक सुखासाठी सेक्स चेंजचे केले होते.

पोलिसांनी सांगितले की आत्महत्या करणारा हा व्यक्ती सर्जरीनंतर शारीरिक समस्येमुळे त्रस्त होता. ते उपचार आणि करनेक्शनल सर्जरी अयशस्वी ठरली. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ही व्यक्ती निराश होती. सूत्रांकडून माहिती मिळते की ऑपरेशनपूर्वी पलक हरिश या नावाने ओळखला जात होता. परंतू पोलिसांनी याला नकार दिला आहे. पोलिसांच्या मते पलक यांच्या आधार कार्ड, वाहन परवाना यावर पलक तिवारी असे नाव आहे. प्राथमिक तपासात हे पलक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती हे पुढे आले आहे.

पोलीस उपनिरीक्षकांनी सांगितले की, त्या व्यक्तीचे शव एमवाय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे आणि तपास करण्यात येत आहे की त्यांने असे पाऊल का उचलले. परंतु या प्रकरणी अद्याप एफआयआर दाखल करण्यात आली नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/