‘हाथरस बलात्कार प्रकरणी खोटे मेसेज व्हायरल केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तरप्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणी खोटे मेसेज व्हायरल केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. विशेषत: व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप प्रमुखांनी यावर लक्ष द्यावे, तसेच कोणाच्या निदर्शनास असा प्रकार आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

हाथरस बलात्कार प्रकरणी चुकीचे मेसेज व्हायरल केले जात असल्याचे पोलिसांच्या निर्दशर्नास आले आहे. त्यापाश्र्वभूमीवर पोलिसांनी संबंधिताविरुद्ध कारवाईचा इशारा दिला आहे. हाथरसप्रकरणी नागरिकांनी फेक व चुकीचे मेसेज डिलीट करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. त्याशिवाय अफवा व खोटी माहिती पसरविणाच्यावर कडक कायदेशिर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही खोट्या अफवांसह इतर चुकीचे मेसेज व्हायरल करु नये. अफवांमुळे धोका निर्माण होउ शकतो. त्यापाश्र्वभूमीवर नागरिकांनी सोशल मीडियाचा जपून वापर करण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर माहितीची देवाण-घेवाण होत असते. मात्र, हाथरस बलात्कार प्रकरणी काहीजणांकडून मुद्दामहून चुकीची माहिती फॉरवर्ड केली जात असल्याचे पोलिसांना दिसून आले आहे. त्यामुळे असे चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांसह संबंधित ग्रुपअडमीनवर कडक कारवाईचा इशारा सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.