प्रसिद्ध अभिनेत्री ‘निम्मी’चं 88 व्या वर्षी मुंबईत निधन !

पोलीसनामा ऑनलाईन :50 आणि 60 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री निम्मी यांचं बुधवारी (दि 25 मार्च 2020 रोजी) सायंकाळी मुंबईत निधन झालं. निम्मी 88 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. सांताक्रूझमधील एका प्रायव्हेट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी (गुरुवार दि 26 मार्च 2020) त्यांच्या अंत्यसंस्कार केले जातील.

फिल्मी दुनियेत नाव कमावणाऱ्या या अभिनेत्रीचं जन्माच्या वेळी नाव नवाब बानो होतं. राज कपूर यांनी तिला निम्मी असं नाव दिलं होतं. 1949 साली आलेल्या बरसात या सिनेमात निम्मीनं पहिल्यांदा काम केलं. प्रसिद्ध फिल्म क्रिटीक कोमल नाहटा यानं ट्विट करून त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे.

निम्मीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर लेखक अली राजा सोबत निम्मीनं लग्न केलं होतं. 2007 साली पती अली राजानं जगाचा निरोप घेतला होता. असं म्हटलं जातं की, करिअरच्या सुरवातीच्या काळात तिला खूप डिमांड होतं. निम्मीनं दिलीप कुमार पासून तर राज कपूर, अशोक कुमार, धर्मेंद्र अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार सोशल मीडियावर शोक व्यक्त करताना दिसत आहे. प्रसिद्ध डायरेक्टर महेश भटनंही ट्विट करत निम्मीला श्रद्धांजली दिली आहे. निम्मीच्या निधनानं बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

निम्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर बरसात हा तिचा पहिला सिनेमा आहे. अपने जमाने की आन, उडन खटोला, मेरे मेहबूब यांसारख्या अनेक सिनेमात काम केलं आहे. त्या काळातील शानदार हिरोईन म्हणून निम्मी ओळखली जाते. 1949 ते 1965 असं तब्बल 16 वर्षे निम्मीनं सिनेमात काम केलं.