मनाविरुध्द लग्न ठरविल्याने तिने सोडले घर, पोलिसांनी शोध घेऊन केले समुपदेशन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आई वडील नसल्याने मावशीकडे राहणाऱ्या तरुणीचे लग्न मनाविरुद्ध एका तरुणाशी ठरविण्यात आले. आणि ती घर सोडून निघून गेली. त्यानंतर यासंदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेऊन समुपदेशन करत तिला घरी परत आणले.

संगिता मोहन पारुखलचे (वय १९) हीला आई वडील नाहीत. त्यामुळे ती मावशीकडे राहण्यास होती. त्यावेळी कुटुंबियांनी तिचे लग्न नात्यातील एका तरुणासोबत ठरविले होते. परंतु ते तिला मान्य नव्हते. त्यामुळे ती ८ एप्रिल रोजी घर सोडून निधून गेली होती. यासंदर्भात तिचे काका संजय सकट यांनी गाडीतळ पोलीस चौकी येथे तक्रार दिली.

त्यानंतर पोलिसांनी तिचा मोबाईल ट्रेसिंगला लावला. त्याचा सतत पाठपुरावा केला. तेव्हा ती स्वारगेट पर्वती दर्शन भागात राहात असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तिला विचारणा केल्यावर तिने काकाकडे जाण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी तिचे समुपदेशन केले. तसेच तिच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांच्यात समेट घडवून आणला. त्यावेळी मुलीने संमती दर्शविल्यानंतरच तोडगा काढून मुलगी सांगेल त्या मुलाशी लग्न करून देण्याचे तिच्या काकांनी मान्य केले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमित घुले, महिला पोलीस शिपाई मिडगुले, बिचुकले, गोरे यांच्या पथकाने यासाठी परिश्रम घेतले.

You might also like