केंद्र सरकारचा देशातील शेतकऱ्यांवर अन्याय, आतापर्यंत झाले ते पुरे … : शरद पवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्जमुक्ती, हमीभाव, वनहक्क कायदा अशा अनेक मागण्यांसाठी देशभरातील शेतकऱ्यांचा मोर्चा आज दिल्लीत धडकला आहे. या मोर्चासाठी देशभरातून अनेक शेतकरी नेत्यांनी हजेरी लावली आहे. याठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी देखील हजेरी लावली” केंद्रातील मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय केला आहे. आतापर्यंत जे झाले ते पुरे. यापुढे आम्ही गप्प बसणार नाही. ७ हजार कोटी बुडवणाऱ्या उद्योगपतींना सरकार कर्जमाफी देते पण गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकारकडे पैसे नाहीत, या सरकारला धडा शिकवावाच लागेल, असा इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्र सरकारला दिला.
दिललीत शेतकऱ्यांचा एल्गार …!  २१ राजकीय पक्षांनी दिला पाठिंबा 
कर्जमुक्ती, हमीभाव, वनहक्क कायदा अशा अनेक मागण्यांसाठी देशभरातील शेतकऱ्यांचा मोर्चा आज दिल्लीत धडकला आहे. या मोर्चासाठी देशभरातून अनेक शेतकरी नेत्यांनी हजेरी लावली आहे. या मोर्चाला देशातील २१ राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन संसद मार्गावर जनसंसद भरवली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, सीपीएम नेते सीताराम येचुरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, योगेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, समाजवादी नेते धर्मेंद्र यादव, तृणमूलचे नेते दिनेश त्रिवेदी, जेडीयू नेते शरद यादव, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आदी नेत्यांनी या किसान संसदेला हजेरी लावत मोदी सरकारवल हल्लाबोल केला. देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांचा मोर्चा आज अखेर संसद मार्गावर धडकला.

सकाळी दहाच्या सुमारास शेतकऱ्यांनी रामलीला मैदानावरून कूच केली. पावणेबाराच्या सुमारास हा मोर्चा संसद मार्गावर पोहोचला. यावेळी देशभरातून आलेल्या सर्व शेतकरी नेत्यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना संबोधित केले. हा मोर्चा म्हणजे सरकारला दिलेला अल्टिमेटम आहे असा सूर सर्वच नेत्यांच्या भाषणातून उमटला. ७००० कोटी बुडवणाऱ्या उद्योगपतींना सरकार कर्जमाफी देते पण गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला या सरकारकडे पैसे नाहीत. या सरकारने देशातील शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय केला आहे. पण आता पुरे झाले. यापुढे आम्ही गप्प बसणार नाही, असे पवार म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तयार केलेले शेतकऱ्यांचे विधेयक आम्ही पारित करू.. संख्येने कमी असलो तरी गैरभाजप पक्षांना एकत्र आणून कर्जमुक्तीचा कायदा पास करू, असं आाश्वासनही पवार यांनी यावेोली दिले.

भाजपला सत्तेतून खाली खेचूः येचुरी 
भाजपचे जनविरोधी सरकार सत्तेतून खाली खेचू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुर्योधन तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दुशासन आहे, अशी टीकाही येचुरी यांनी यावेळी केली.
मुस्लीम राम मंदिराच्या विरोधात नाही: अब्दुल्ला 
मुस्लीम समाज राम मंदिराच्या विरोधात नाही तर राम मंदिराच्या नावाने जो धार्मिक विद्वेश पसरवला आहे त्याच्या विरोधात आहे, असे ठाम मत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले. काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. धर्मनिरपेक्ष भारताच्या निर्मितीची खरी गरज आहे, असं ते यावेळी म्हणाले.
देशाचा पंतप्रधान शेतकरी असेल: राजू शेट्टी 
यापुढच्या निवडणुका शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर लढल्या जातील आणि देशाचा पुढचा पंतप्रधान शेतकरीच असेल, असे राजू शेट्टी म्हणाले. तसंच शेतकरी धोरणामध्ये सरकारला अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले. ऊस शेतकऱ्यांसाछी साडे नऊ टक्के एफआरपीची मागणीही त्यांनी अधोरेखित केली.