Lady Finger Face Pack : मुरूमांपासून मुक्त व्हायचंय तर लावा भेंडीचा ‘पॅक’, जाणून घ्या फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भेंडी केवळ चवीसाठीच चांगली नाही तर त्याचे बरेच फायदे आहेत. भेंडीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, कॉपर, सोडियम, सल्फर, प्रथिने, आयोडीन, व्हिटॅमिन ‘ए’, व्हिटॅमिन ‘बी’ कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन ‘सी’ आढळतात. जर भूक कमी लागत असेल किंवा शरीरात अशक्तपणा येत असेल तर भेंडी खा. भेंडी केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नसते तर त्वचेसाठी बरेच फायदे देखील आहेत.

जर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर आपण या पॅकचा वापर करू शकता. याचा उपयोग केल्याने चेहर्‍यावर तेज येते आणि चेहर्‍यावरील डागही दूर होतात. बाजारातील कॉस्मेटिक उत्पादनांपेक्षा भेंडीचा फेस पॅक अनेक पट जास्त प्रभावी आहे.

सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे चेहर्‍यावरील तेज कमी होते आणि चेहऱ्यावरील पिंपल्स, ड्राय स्किनची समस्या, स्किन इन्फेक्शन, वेळेआधी फाईन लाईन्स येतात. भेंडीचा फेसपॅक या सर्व समस्यांपासून सुटका देते.

फेस पॅक कसा बनवायचा :

भेंडीचा फेसपॅक तयार करण्यासाठी 8-10 भेंडी घ्या आणि धुवून मिक्सरमध्ये बारीक करा. लक्षात ठेवा त्यात पाणी घालू नका. जाड पेस्ट बनवा. ही पेस्ट 15 मिनिट चेहऱ्यावर लावा आणि मग चेहरा धुवा. आपण आठवड्यातून एकदा हा पॅक वापरू शकता.