Masoor Dal Face Mask : त्वचेवर प्रदुषणाचा परिणाम कमी करायचा असेल तर मसूर डाळीचा पॅक लावा, जाणून घ्या फायदे

पोलीसनामा ऑनलाइन – तुमच्या किचनमध्ये तुमच्या सौंदर्याचा खजिना लपलेला आहे. होय, किचनमधील रेमेडिज तुमच्या स्किनची ट्रीटमेंट करू शकतात. किचनमधील मसूर डाळ तुमच्या स्किनला प्रदुषणापासून वाचवून सुंदर बनवू शकते. मसूर डाळीच्या वापराने तुमच्या चेहर्‍यावर ग्लो येईल आणि मुरूमांपासून मुक्ती मिळेल. मसूर डाळीत अनेक प्रकारचे मिनरल, व्हिटॅमिन, अँटीऑक्सीडेंट असतात, जे त्वचेसाठी खुप सुरक्षित असतात. मसूर डाळीचा पॅक कसा तयार करायचा ते जाणून घेवूयात.

मसूर डाळीचा असा करा वापर :
1 मसूर डाळीची पेस्ट बनवून त्यामध्ये बेसन आणि मुलतानी माती मिसळून चेहर्‍यावर लावा. हे सुकल्यानंतर चेहरा धुवून घ्या.

2 मसूर डाळीत दूध आणि अंड्याचा सफेद भाग मिसळून त्याची पेस्ट बनवून चेहर्‍यावर लावा. हा पॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवून काढा.

3 मसूर डाळीत अक्रोड पावडर मिसळा आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा.

4 त्वचा तेलकट असेल तर मसूर डाळीच्या पावडरमध्ये दूध मिसळून वापरा. आठवड्यातून एकदा लावा.

5 त्वचा कोरडी असेल तर मसूर डाळीच्या पावडरमध्ये मध मिसळून चेहर्‍यावर लावा. काही वेळाने चेहरा धुवून घ्या.

6 त्वचा तेलकट असेल तर मसूर डाळीच्या पावडरमध्ये सफेद व्हिनेगरचे काही थेंब टाकून चेहर्‍यावर लावा.

7 नॉर्मल त्वचेसाठी मसूर डाळीच्या पावडरमध्ये दही आणि सफेद व्हिनेगर किंवा लिंबू रस मिसळून चेहर्‍यावर लावा. सुकल्यानंतर चेहरा धुवून घ्या.