‘या’ अभिनेत्रीवर फॅशन डिझायनरला मारहाण केल्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री प्राजक्ता माळी विरोधात एका फॅशन डिझायनरने शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. प्राजक्ता माळी विरोधात काशिमीरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जान्हवी मनचंदा यांनी हा आरोप केला आहे.

प्राजक्ताला डिझायनर जान्हवी मनचंदा हिने दिलेले कपडे योग्य नव्हते या क्षुल्लक कारणावरून तिने मारहाण केली आहे असा आरोप जान्हवीने केला आहे. मुख्य म्हणजे प्राजक्ता आणि जान्हवी यांच्यात याबाबत झालेल्या संभाषणाचा व्हॉट्सअ‍ॅप स्क्रिनशॉटही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान प्राजक्ता माळीने याबाबत बोलताना मात्र तिच्यावरील आरोप हे खोटे आहेत असे सांगत सर्व आरोप फोटाळून लावल्याचे समजत आहे. याबाबत बोलताना प्राजक्त माळी म्हणते की, “माझे आणि जान्हवीचे कपड्यांवरून वाद झाले होते हे खरे आहे. पंरतु तिला मी कोणत्याही प्रकारची मारहाण केलेली नाही. तिने केलेल सर्व आरोप हे खोटे आहेत.” असे प्राजक्ता म्हणाली आहे.

दरम्यान जान्हवीने मात्र प्राजक्ताने आपल्याला मारहाण केली आहे अशी तक्रार दाखल केली आहे. जान्हवीने केलेल्या आरोपांनुसार, पोलिसांनी प्राजक्ता माळी विरोधात कलम 323 आणि 404 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

 

Loading...
You might also like