सांगलीत थरार… मद्यधुंद चालकाने 10 वाहनांना उडविले

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

मद्यधुंद चालकाने आठ ते दहा गाड्या चिरडल्याची खळबळजनक घटना सांगली शहरात गुरूवारी मध्यरात्री घडली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून या घटनेत दोन कारसह एका जीपचा चक्‍काचुर झाला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी ट्रक चालकाला चांगलाच प्रसाद दिला आहे. नागरिकांनी चालकाला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सांगली शहर पोलिसांनी चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला असुन ट्रक जप्‍त केला आहे. या घटनेमध्ये जीवित हानी झालेली नाही मात्र वाहनांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. संजय नागु राऊत (35, रा. दहिवडी, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या मद्यधुंद चालकाचे नाव आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a7a6d626-c2e8-11e8-83af-d96bc2f6fee1′]
गुरूवारी मध्यरात्री कॉलेज कॉर्नरकडून राऊत हा त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात सांगलीकडे घेवुन निघाला होता. त्यानंतर गावभागातील टिळक चौक परिसरात तो ट्रक घुसला. परिसरातील रस्ते अरूंद असल्याने रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांना ट्रकने चिरडले. आठ ते दहा वाहनांना चिरडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. दोन कारसह एका जीपचे मोठे नुकसान झाले. नागरिकांनी ट्रकचा पाठलाग करून मद्यधुंद चालक राऊत याला चांगलाच चोप दिला. दरम्यान, सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राऊतला अटक करण्यात आली असून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सांगली शहर पोलिस करीत आहेत.

[amazon_link asins=’B078J1XCPW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cd95fc73-c2e8-11e8-92ff-7fc90ec650da’]

एल्गार परिषद : पाचही जणांची नजरकैद कायम