धक्कादायक ! ..म्हणून दोरीने गळा आवळून बापानेच केला मुलाचा खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मशीन विकण्यास विरोध करतो म्हणून संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शिवारात बापाने दोरीने गळा आवळून मुलाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.
अंकुश दत्तात्रय हुलवळे (वय २८) असे मुलाचे नाव आहे. संगमनेर पोलिसांनी दत्तात्रय रामचंद्र हुलवळे (वय ५५) याच्यााविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारात दत्तात्रय हुलवळे कुटुंबीय राहते. वडील दत्तात्रय हुलवळे यांना मुलगा अंकुश दत्तात्रय हुलवळे हा मशीन विकण्यास तसेच घरातील वस्तु विकण्यास नेहमी विरोध करीत होता. वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन मुले अंकुश हुलवळे व प्रविण हुलवळे यांच्या नावावर करण्यात आली होती. गायींचा चारा कापण्याचे मशीन विकण्यास अंकुश याने वडिलांना विरोध केला. याच रागातून सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय हुलवळे याने अंकुश याचा दोरीने गळा आवळून खून केला.

या घटनेप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अंकुश हुलवळे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदनात अंकुश याचा गळा दाबून खुन करण्यात आल्याचे दिसून दिले. अंकुशवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याचा भाऊ प्रविण दत्तात्रय हुलवळे यांनी वडिलांनी भावाचा दोरीने गळा आवळून खून केल्याची फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दत्तात्रय हुलवळे याच्याविरुद्ध मुलाच्या खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

अळूच्या भाजी तुमच्या शरीरासाठी IMP ; हे आहेत फायदे

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

Loading...
You might also like