फेब्रुवारीमध्ये 4 ग्रहांमध्ये ‘परिवर्तन’, ‘या’ 6 राशींसाठी ‘भाग्यशाली’ असेल संपुर्ण महिना, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रहांची स्थिती बदलते तेव्हा त्याचा लोकांच्या जीवनावर परिणाम होत असतो. सर्व नऊ ग्रह एका निश्चित अंतराने एका राशीतून दुसर्‍या राशीत जात असतात. २०२० मध्ये बरेच ग्रह आपली राशी बदलतील. फेब्रुवारी महिन्यात बुध, शुक्र, मंगळ व सूर्याच्या राशीमध्ये बदल होतील. या ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेक राशींसाठी हा महिना शुभ असणार आहे. जाणून घेऊया २० फेब्रुवारी २०२० मधील सर्व ग्रहांची स्थिती आणि त्याचा मूळ लोकांवर होणारा परिणाम.

सूर्य –
सूर्य या वेळेस शनीची राशी मकर मध्ये आहे. १३ फेब्रुवारीला सूर्य मकर राशीतून कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल. सूर्याला सर्व ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्य ३० दिवसात एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला नेहमीच सरळ फिरणारा ग्रह म्हणून ओळखले जाते. सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे याचा सर्वाधिक परिणाम नोकरदारांवर होत असतो.

चंद्र –
चंद्र नेहमी अडीच दिवसांनी राशी परिवर्तन करत असतो.

मंगळ –
जोतिषशास्त्रात मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन खूप महत्वाचे मानले जाते. मंगळाचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे याचा सर्व १२ राशींवर परिणाम होत असतो. मंगळ ग्रह ८ फेब्रुवारीला वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे.

बुध –
३१ जानेवारी ला बुध ग्रहाने मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला आहे. जेव्हा कुंडलीमध्ये बुध ग्रह शक्तिशाली असतो, तेव्हा तो मूळ माणूस एक विद्वान असतो आणि त्याची तर्क क्षमता मजबूत असते.

Advt.

गुरु –
फेब्रुवारीच्या महिन्यात गुरु या ग्रहाचे राशी परिवर्तन होणार नाही.

शुक्र –
३ फेब्रुवारी रोजी शुक्र कुंभ पासून मीन राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या शुभ परिणामामुळे आयुष्यात आराम व आनंद मिळतो.

शनि –
फेब्रुवारी महिन्यात शनीच्या राशीत परिवर्तन होणार नसल्याने यावेळी शनि मकर राशीत आहे. आता अडीच वर्षानंतर शनि आपली राशी बदलणार.

राहू –
फेब्रुवारी महिन्यात राहूचे राशीचे परिवर्तन होणार नाही.

१२ राशीच्या चिन्हावर ग्रहांचा प्रभाव –
शुभ प्रभाव –
वृषभ, मिथुन, सिंह , तूळ , धनु आणि मकर
अशुभ प्रभाव – मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, कुंभ आणि मीन