महिला डॉक्टरनं आतून बंद केला रूम, नंतर खाल्ल्या BP च्या 50 गोळ्या

पाटणा : पाटणाच्या आयजीआयएमएसमध्ये एका ज्यूनियर महिला डॉक्टरने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरने एकावेळी बीपीच्या 50 गोळ्या खाल्ल्या होत्या. ज्यामुळे तिची प्रकृती बिघडू लागली. ताताडीने तिला इमर्जन्सी वॉर्डमध्ये भरती करण्यात आले, जेथे तिच्यावर उपचार सुरू आहे. तर घटनेबाबत पोलीस आणि हॉस्पीटल प्रशासन कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत.

ज्युनियर डॉक्टर मुळची रांची येथील राहाणारी आहे. ती आयजीआयएमएसच्या बालरोग विभागात पेडियाट्रिक्स आयसीयूमध्ये ज्यूनियर रेसिडेंट आहे. ही ज्यूनियर डॉक्टर हॉस्टेलमध्ये राहाते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॉस्टेलमध्ये राहणारी तिची मैत्रिण काही कामासाठी खोलीच्या बाहेर गेली होती. ती परतली तेव्हा खोलीचा दरवाजा आतून बंद होता. काहीवेळापर्यंत दरवाजा न उघडल्याने मैत्रिणीने वरिष्ठांना ही माहिती दिली.

पोलिस आल्यानंतर खोलीचा दरवाजा तोडला असता महिला डॉक्टर बेशुद्ध आढळली. तेव्हापासून तिला इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर डॉक्टरचे कुटुंबिय आणि नातेवाईक सुद्धा हॉस्पीटलमध्ये पोहचले आहेत.

सांगितले जात आहे की, महिला डॉक्टर जहानाबादच्या एका मोठ्या प्रशासकीय अधिकार्‍याची पुतणी आहे. शास्त्री नगर पोलीस ठाण्याचे प्रमुख विमलेंदु कुमार यांनी सांगितले की, महिला डॉक्टर आयसीयूमध्ये दाखल आहे. तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. महिला डॉक्टर शुद्धीवर आल्यानंतरच पोलिसांना स्पष्ट माहिती मिळेल.

You might also like