Fenugreek Water Benefits | मेथीच्या पाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, वाचा सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आजकाल सगळेच खूप धकाधकीच जीवन जगत आहेत. यासगळ्यामध्ये स्वत:ला टिकवून ठेवायचे असेल, तर प्रत्येकाला आप-आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे (Health Tips). यासाठी आहार हा एक महत्वाचा घटक आहे. (Fenugreek Water Benefits) त्यामध्ये सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवनापर्यंतची सगळी नियमावली येते. आपल्याला माहित असेल की, सकाळी झोपेतून उठल्यावर लगेचंच जड किंवा पचन्यास वेळ घेणारे अन्न खाऊ नये. (Fenugreek Water Benefits) यामुळे काहीजण सकाळीमेथीचे पाण्याचे सेवन करतात. परंतू अजुनही अनेकांना ते पाणी प्यायल्याने काय फायदे मिळतात, माहित नाहीय. तर काळजी करू नकाआज आम्ही तुम्हाला याच विषयी सांगणार आहोत (5 Health Benefits Of Having Fenugreek Water).

 

– मधुमेह नियंत्रित करते (Diabetes)
भिजवलेली मेथी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित (Blood Sugar Level Control) ठेवण्यासाठी आश्चर्यकारक काम करते. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही मेथीचे पाणी देखील घेऊ शकता. त्याच वेळी, तुम्ही अंकुरलेल्या मेथीचे सेवन देखील करू शकता कारण त्यात भिजवलेल्या मेथीपेक्षा 30-40 टक्के अधिक पोषक असतात.

 

– कोलेस्ट्रॉल कमी करते (Cholesterol)
उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास असलेल्यांनी भिजवलेले मेथीचे दाणे खावे. भिजवलेल्या मेथीच्या दाण्यासुद्धा कोलेस्ट्रॉल कमी करण्यास खूपमदत करतात. (Fenugreek Water Benefits)

– पचन सुधारते (Improving Digestion)
मेथीमध्ये असलेले पाचक एंझाइम स्वादुपिंड अधिक सक्रिय करतात. मेथीमध्ये असलेले फायबर तुमची पचनक्रिया सुधारते.

 

– त्वचा आणि केस (Skin And Hair)
मेथी त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. मेथीच्या सेवनाने केस गळणे टाळता येते. तसेच मेथीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे त्वचेची जळजळ कमी होण्यासही मदत होते.

 

– मेथीचे पाणी कसे तयार करावे (How To Make Fenugreek Water)
रात्री एक ग्लास स्वच्छ पाण्यात एक ते दीड चमचा मेथीचे दाणे भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी चांगले गाळुन रिकाम्या पोटी प्या.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Fenugreek Water Benefits | 5 benefits of having fenugreek water

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Nitin Deshmukh | राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच शिवसेना आमदाराच्या पत्नीनं केली पोलिसांत तक्रार

 

Eknath Shinde | पहिला ‘ठाकरी’ झटका ! एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून हटवले

 

Eknath Shinde | गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी?; म्हणाले – ‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक…’