Fertility | बेबी प्लान करत असाल तर आतापासून सुरू करा ही ५ कामे, कन्सीव्ह करण्यासाठी होईल मदत

नवी दिल्ली : Fertility | डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांसोबत दिनचर्येत काही बदल केल्यास गर्भधारणा (Pregnancy) होण्यास मदत होते. यामुळे फर्टिलिटी (Fertility) वाढते आणि प्रेग्नंट होण्यास मदत होते. गर्भधारणा करायची असेल तर आजपासूनच या टिप्स फॉलो करा (Things To Do When Trying For Baby).

धूम्रपान टाळा
धूम्रपानामुळे (Smoking) पुरुष आणि स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. गर्भाच्या योग्य विकासात अडथळा येतो, काहीवेळा गर्भपात (Abortion) देखील होतो. मुलाच्या डीएनएचे नुकसान होते. यामुळे गर्भधारणेचा प्रयत्न करत असाल तर धूम्रपान टाळा.

फॉलिक अ‍ॅसिड घेणे सुरू करा
कन्सीव्ह करण्याचा प्रयत्न करत असाल तर महिलेने फॉलिक अ‍ॅसिडच्या (Folic Acid) गोळ्या घेणे सुरू केले पाहिजे. गर्भधारणा होण्यास मदत करण्यासोबतच, फॉलिक अ‍ॅसिड मुलाचे न्यूरल ट्यूब सारख्या दोषांपासून देखील संरक्षण करते. गर्भनिरोधक थांबवल्यानंतर लगेच फॉलिक अ‍ॅसिड घेणे सुरू केले पाहिजे. (Fertility)

निरोगी आहार
निरोगी आहात प्रजनन क्षमता सुधारतो. आहारात धान्य, नट्स, हिरव्या भाज्या, बीन्स आणि कडधान्यांचा समावेश करा. गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेदरम्यान सकस आहार घेतल्यास गर्भाचा चांगला विकास होतो. स्त्रीच्या शरीरातील अशक्तपणा दूर होईल.

कॅफिनचे सेवन कमी करा
बेबीचे प्लानिंग करत असाल तर कॅफीनचे सेवन टाळा. कॅफिन फर्टिलायझेशनवर परिणाम करते. याच्या अतिसेवनामुळे शरीराबरोबरच गर्भालाची हानी होते.

वजन
कन्सीव्ह करण्यासाठी निरोगी वजन आवश्यक आहे. कमी-जास्त वजनाचा थेट परिणाम फर्टिलायझेशनवर होतो.
वजन जास्त असेल तर सकस आहारासोबत व्यायाम करा. तसेच वेळोवेळी बॉडी मास इंडेक्स तपासत राहा.
तत्पूर्वी डॉक्टरांची आवश्य भेट घ्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police News | पोलीस प्रोत्साहन भत्त्याच्या रक्कमेत वाढ करण्याची मागणी

ACB Trap News | दोन लाखांची लाच मागणाऱ्या तलाठ्यावर अँन्टी करप्शनकडून FIR