अखेर तो ‘सिरियल रेपिस्ट’ गजाआड

वसई : पोलीसनामा ऑनलाईन

गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर असल्या सिरियल रेपिस्टला नवीमुंबई पोलिसांनी मिरा रोड येथून केली अटक केली आहे. प्रसाद असे या सिरियल रेपिस्टचे नाव असून तो पालघर, ठाणे ग्रामीण व शहरात, नवी मुंबई आणि मुंबई पोलिसांच्या हिट लिस्टवर होता. त्याच्यावर वेगवेगळ्या पोलिसठाण्यांमध्ये 12 पेक्षा जास्त अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबई पोलिसांनी अखेर या सिरियल रेपिस्टच्या मुसक्या आवळल्याने पोलिसांबरोबरच नागरिकांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a28d7d8b-c1ab-11e8-83e1-6f0247919f33′]

गेल्या आठवड्यात नालासोपाऱ्यात या सिरीयल रेपिस्टने 4 दिवसात 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील वसई, विरार, नालासोपाऱ्यामध्ये सिरीयल रेपिस्ट दाखल झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सिरियल रेपिस्ट वसई आणि विरारमध्ये दाखल झाल्याने नागरिक दहशतीखाली होते. सीरिअल रेपिस्टने मुंबई, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, तसेच पालघर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींना या नराधमाने आपली शिकार बनवलं आहे. त्याने नालासोपाऱ्यात आठ दिवसात दोन मुलींना त्याने आपली शिकार बनवले. याबाबत तुलिंज पोलीस ठाण्यात बलात्कार आणि विनयभंग असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. सदर घटनेमुळे परिसरात  दहशतीचं वातावरण पसरलं होत.
[amazon_link asins=’B07CK74Y2W,B01GZPDV2W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b7886e90-c1ab-11e8-bef8-990eb37d4bbe’]त्यामुळे  नागरिकांनी स्वतःच ‘जागते रहो’चा नारा दिला होता. रात्रीच्या अंधारातही हातात काठी घेऊन पालक पहारा देत होते. हा नराधम 9-14 वर्षे वयोगटातील लहान मुलींवर पाळत ठेवतो. मुलींच्या मागे जातो, तुझ्या वडिलांनी मला तुला घ्यायला पाठवलं आहे, तुझ्या वडिलांचं पार्सल आलं आहे, अशा बतावण्या करून मुलींना सोबत घेऊन जातो. मुलींना निर्जनस्थळी नेऊन हा नराधम अतिप्रसंग करतो. सध्या त्याच्यावर नवी मुंबईत सहा, मुंबईत एक, ठाणे शहर येथे एक, ठाणे ग्रामीण येथे दोन, तर पालघर जिल्ह्यात दोन घटना घडल्या आहेत. चार दिवसात पालघर जिल्हयातील तुलिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घटना घडल्या आहेत.

पुणे  :  जंगलात मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

एका अल्पवयीन मुलीवर या नराधमाने बलात्कार केला आहे. तर दुसरी या नराधमाच्या तावडीतून पळून जाण्यास यशस्वी झाल्याने तिचा विनयभंग केला आहे. नालासोपारा येथे दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होते. मात्र या नराधमाच्या मुसक्या आवळ्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.