30 हजार शेतकऱ्यांना मिळणार ‘खास’ ऑनलाईन सुविधा, ‘या’ कंपनीनं केलं ‘नियोजन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फिनटेक समाधान प्रदाता बीसीपी बँकिंग टेक्नेलॉजीने (BPC Banking Technology) लहान शेतकऱ्यांना आर्थिक, प्रौद्योगिकी, बाजार आणि जोखिम प्रबंधन उपकरणांपर्यंत उपलब्ध करुन देण्यासाठी एक डिजिटल मंच ‘सफल फसल’ सादर केला आहे.

कंपनीने सांगितले की, लखनऊमध्ये सादर करण्यात आलेल्या बाजार मंचावर जवळपास 30,000 शेतकऱ्यांना उपल्बध करुन देणार आहे.

या कंपन्यांनी केली भागीदारी –
कंपनीकडून सांगण्यात आले की आयसीसीआय बँक, टॅनेगर इंटरनॅशनल, बायर, श्योर, सब – के, किसान साथी, ट्रांसिटी, इंडिया हेल्थ लिंक आणि गपशप्स सारख्या कंपनींनी या ऑनलाइन प्लॅटफॉर्मबरोबर भागीदारी केली आहे.

बीपीसी बँकिंग टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष अनातोली लोगिनोव यांनी सांगितले की हा डिजिटल शोध, शेतकऱ्यांना आर्थिक आणि व्यावसायिक हितधारकांच्या बरोबर जोडून त्यांनी सशक्त बनवणे.

खरेदीदार आणि विक्रेत्यांना जोडण्याचा उद्देश्य सफल फसलचा उद्देश्य आहे. कंपनीने सांगितले की शेतकरी अधिक कुशल आणि टिकाऊ बियाणं उत्पादकासाठी सल्लागार सेवांचा उपयोग करु शकतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/