मुंबई : मरीन लाईन येथील ‘फार्च्युन’ हॉटेलला आग, 30 डॉक्टरांना वाचविण्यात यश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मरीन लाईन येथील फार्च्युन हॉटेल असलेल्या इमारतीला रात्री आग लागली. यावेळी या इमारतीत क्वारंटाईन करुन ठेवण्यात आलेले काही नागरिक आणि ३० निवासी डॉक्टरांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.


फार्च्युन हॉटेलच्या २ आणि ४ मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे रात्री आग लागली होती. आगीची घटना समजताच अग्निशामक दलाच्या १० गाड्या व वॉटर टँकर घटनास्थळी पोहचले. या वेळी हॉटेलमध्ये जे जे हॉस्पिटलमधील ३० निवासी डॉक्टरांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. हे डॉक्टर व अन्य क्वारंटाईन केले लोक त्यावेळी हॉटेलमध्ये होते. आग लागल्यानंतर सर्वत्र धुर पसरला. त्यामुळे लोकांना काहीच दिसत नव्हते. अग्निशामक दलाच्या जवानांनी सर्व डॉक्टर व इतरांना सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर डॉक्टरांची सोय ट्राईडेंट हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या हॉटेलमध्ये फायर फायटिंग सिस्टिम नसल्याचे समोर आले आहे. यात हॉटेलची मोठी चुक आहे. अशा हॉटेलमध्ये कोरोना वारियर्स यांना कसे काय ठेवले गेले. या हॉटेलची निवड कशी करण्यात आली. मोठी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोन असे अनेक प्रश्न निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने उपस्थित केले आहेत.