सिन्नरजवळ ऑईलच्या कारखान्याला आग 

सिन्नर : पोलिसनामा ऑनलाइन – सिन्नरजवळील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील ऑईल बनविणाऱ्या कारखान्यात शनिवारी पहाटे भीषण आग लागली. सिन्नर एमआयडीसी, रतन इंडिया, नाशिक व संगमनेर येथून अग्निशामन दलाचे बंब बोलविण्यात आले असून आग ५ तासानंतरही विझविण्यात अद्याप यश आलेले नाही.

मुसळगाव औद्योगिक वसाहतीत सुयोग कानडे व आशुतोष पानगव्हाणे यांच्या मालकीचा जनार्दन फियल या नावाने जुन्या टायरपासून  ऑईल बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्याला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशामन दलाचे ६ बंब आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण कारखान्यात ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अद्याप पुरेसे यश मिळालेले नाही. यात लाखों रुपयांचे नुकसान झाले.