धानोरी गावात घरामध्ये आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – धानोरी येथील संकल्पन नगरी परिसरातील एकता इमारतीमधील घरात आग लागल्याची घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली आणि घरातील आग लागलेल्या पलंगामध्ये

ठेवलेली ९ हजार २०० रुपयांची रोकड जळण्यापासून वाचविली.

मिळालेल्या माहितीनुसार, धानोरी येथील संकल्प नगरी येथे एकता इमारतीत राहणारे कुटुंबिय बाहेर गावी गेले होते. त्यांचे भाडेकरू त्यावेळी घरी होते. बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमासार या घरातील पलंगामध्ये आग लागली. या घरातून धूर येत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. दरम्यान त्या पलंगाखाली ठेवलेली ९ हजार २०० रुपयांची रोकडही त्यांना वाचवता आली.

ही आग प्रभारी अधिकारी सुभाष जाधव,तांडेल देवकर, फायरमन सुनील पाटोळे, चालक सुनील धुमाळ यांनी आटोक्यात आणली.