मालेगावातील अग्नितांडवात सहा घरे जळून खाक, 4 महिन्याच्या बालकाचा मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मालेगाव शहरातील आय्यबनगर भागात लागलेल्या आगीत सहा घरे जळून खाक झाली आहेत. यामध्ये एका चार महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी घडली आहे. अस्सान मोबीन अहमद या चार महिन्याच्या बालकाचा होरपळून मृत्यू झाला. अस्सानच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अग्नितांडवात सहा घरे जळाले असून मृत्यू झालेल्या अस्सानची आई यास्मीन अहमद ही गंभीर जखमी झाली आहे. आगीमध्ये संपूर्ण घरे जळून खाक झाली असून घरातील संसारोपयोगी साहित्य जळाल्याने नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.

आग लागल्याचे समजताच महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या सात बंबांनी आग विझवली. सहा मिटर रुंद गल्लीत आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना चांगलीच कसरत करावी लागली. अग्निशमन दलाचे अधिकारी संजय पवार व जवानांच्या तत्परतेमुळे नागछाप झोपडपट्टी आगीची पुनर्रावृत्ती टळली. आगीचे नेमके कारण जरी स्पष्ट झाले नसले तरी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com