दौंड तालुक्यातील वाखारी जवळ गोळीबार करून मारहाण

दौंड : पोलीसनामा आॅनलाइन

दौंड तालुक्यातील वाखारी जवळ असणाऱ्या न्यू अंबिका कला केंद्रासमोर बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्कॉर्पिओतुन व अन्य वाहनांतून आलेल्या सोळा ते वीस जनांच्या टोळक्याने फिर्यादीची इनोव्हा अडवत जोरदार मारहाण करून गोळीबार केल्याची थरारक घटना घडली आहे. या प्रकरणी फिर्यादी ऋषिकेश बाळकृष्ण भोंडवे वय २८ वर्षे रा.रावेत शिंदेवस्ती पिंपरी चिंचवड यांनी फिर्याद दिली असून यवत पोलीसांनी आरोपिंविरोधात भा.द.वि. कलम ३०७,१४३,१४४,१४७,१४८,१४९, आर्म अँक्ट ३,२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

[amazon_link asins=’B07418TNB1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’58fb2393-ac43-11e8-8ba9-6f2ebef7ea8a’]

या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहिती नुसार, बुधवार दि.२९ ऑगस्ट रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास यातील आरोपी मजकूर यांनी फिर्यादी व त्यांचे मित्र  इनोव्हा गाडीतून येत असताना आरोपी मजकूर यांची  स्कॉर्पिओ गाडी नं. एमएच १२ जे एन २९७ ही टोल नाक्यावर टोल देत नसल्याने फिर्यादी  यांनी खाली उतरून टोल मी देतो पण गाड्या जाऊद्या, असे म्हणाल्याचा राग मनात धरून फिर्यादींची गाडी अंबिका काळकेंद्र जवळ आली असता आरोपी मजकूर यांनी फिर्यादी ऋषिकेश भोंडवे यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने काठी, धारदार हत्यार व लाथा बुक्यानी मारहाण करत गोळीबार करून फिर्यादीस जिवे मारण्याचा फिर्यादिस जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

यावेळी फिर्यादीसोबत असणाऱ्या मित्रांनाही मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच यवतचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून यवत पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे हे करीत आहेत.

जाहिरात