खळबळजनक : माजी नगरसेवक, बिल्डरवर गोळीबार

बदलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील माजी नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक संजेश पातकर यांच्यावर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने संजेश हे बाजूला झाल्याने या हल्ल्यातून बचावले. यामुळे बदलापूरात एकच खळबळ उडाली.

संजेश पातकर हे बुधवारी संध्याकाळी त्यांच्या कर्जत रोडवरील मनोरमा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कार्यालयाच्या आवारात उभे होते. त्यावेळी पल्सर मोटरसायकलवरुन दोघे जण त्यांच्या कार्यालयासमोर आले. या दोघांनी डोक्यावर हेल्मेट घातले होते. तसेच कपड्याने चेहरा झाकलेला होता. त्यांनी संजेश यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यावेळी संजेश बाजूला पळाल्याने थोडक्यात बचावले.

या घटनेचे वृत्त समजताच बदलापूर पूर्व व पश्चिम पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी, कर्मचारी तातडीने याठिकाणी पोहचले. सहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील, पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे आदींनीही घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली. पोलिसांनी याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून याप्रकरणी तपास सुरू केला आहे. दरम्यान, हा हल्ला कुणी व त्यामागे काय उद्देश होता, याची माहिती मिळू शकलेली नाही.

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय

लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

 

Loading...
You might also like