होळी उत्सवा दरम्यान भाजप आमदारावर गोळीबार ; परिसरात प्रचंड खळबळ

लखनौ : वृत्तसंस्था – होळीच्या सणाला गालबोट लागले असून होळीचे सेलिब्रेशन करत असताना भाजपच्या आमदारावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील लखिमपूर येथे ही घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये आमदार योगेश वर्मा हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

होळीनिमीत्त आज देशभऱात सर्वत्र रंग खेळले जात आहेत. मात्र, या सेलिब्रेशनदरम्यान लखिमपूर येथील भाजप कार्य़ालयाच्या परिसरात रंग खेळण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. होळीचे सेलिब्रेशन रंगात आले असतानाच आमदार योगेश वर्मा यांच्यावर काही अज्ञातांनी गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या पायाला चाटून गेली. या घटनेमुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली.


दरम्यान, जखमी झालेल्या आमदार वर्मा यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर आता धोका टळला आहे. मात्र, पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. राजकीय वैमन्यस्यातून हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

You might also like