भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम युतीची पहिलीच जाहीर सभा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

मजलीस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एमआयएम) आणि प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ हे राज्यात युती करुन निवडणुका लढणार आहेत. औरंगाबाद मध्ये जबिंदा लॉन्सवर युतीची पहिली एकत्र सभा होणार आहे. प्रकाश आंबेडकर या युतीचं नेतृत्व करणार आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील विविध समाज घटकांशी संबंधित संघटनांची एकत्र मोट बांधून वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5dfb7a53-c62d-11e8-b84c-6b7d1163dbdf’]

औरंगाबादच्या जबिंदा लॉन्सवर दलित-मुस्लिम ऐक्याचा एल्गार बघायला मिळणार आहे. कारण ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल ए मुसलमिनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर येणार आहेत. बहुजन वंचित आघाडीच्या पहिल्या सभेसाठी तब्बल ५ लाख लोकांचा समुदाय जमवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. दरम्यान या जाहीर सभेआधी ओवेसी आणि आंबेडकर यांच्यात एक बैठक होणार आहे. या सभेकडे समस्त राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागून आहे.

एमआयएम आणि भारिप युतीची ही पहिलीच जाहीर सभा असून सभेला तुफान गर्दी जमली आहे. बहुजन-वंचित विकास आघाडीची ही सभा थोड्याच वेळाच सुरु होणार आहे. या युतीमुळे राजकारणाचे रंग नक्कीच बदलतील.

[amazon_link asins=’B06XN6BY5V,B07B8J4HXV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6e955b5c-c62d-11e8-a299-efb91e2c3a55′]
याआधी ३० वर्षांपूर्वी दलित मुस्लिम मुक्ती सेना युतीचा प्रयोग करण्यात आला होता. त्याचा सार्वधिक फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना बसला होता. राज्याच्या समस्त राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेली ही नवीन युती राजकारणाला कशी कलाटणी देईल हा नक्कीच औसुक्याचा विषय आहे.

जाहिरात