Coronavirus : चीनमधून आली दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या ‘वॅक्सीन’चं 14 लोकांवरील परिक्षण ‘यशस्वी’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने धास्तावलेल्या चीनने 17 मार्चला कोरोना व्हायरससाठी तयार करण्यात आलेल्या वॅक्सीनची वैद्यकीय चाचणी सुरु करण्यात आली होती. म्हणजेच माणसांवर याचे परिक्षण सुरु होते, आता या परीक्षणाचे अत्यंत प्रभावी आणि पॉझिटिव्ह रिजल्ट समोर येत आहेत.

या ट्रायलसाठी 108 लोकावर प्रयोग करण्यात आला होता ज्यातील 14 लोकांनी वॅक्सीनचे परीक्षणचा कालावधी तयार केला आहे. 14 दिवसांपर्यंत क्वारंटाइन राहिल्यानंतर त्यांना आपापल्या घरी सोडण्यात आले आहे.

हे परीक्षण चीनच्या वुहान शहरात सुरु होती. वॅक्सीनच्या परीक्षणानंतर पाहिले गेले की जे 14 लोक आपापल्या घरी गेले ते आता पूर्णपणे सुरक्षित आणि तंदुरुस्त आहेत. तसेच डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत.

हे वॅक्सीन चीनच्या सर्वात मोठ्या बायो-वॉरफेअर सायंटिस्ट चेन वी आणि त्यांच्या टीमने तयार केले आहे, ज्या 108 लोकांचे परीक्षण केले होते ते सर्व लोक 18 वर्षांपासून 60 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील आहेत.

या सर्व लोकांना तीन समूहात वेगळे करण्यात आले होते. या 3 गटातील लोकांना वेगवेगळ्या प्रमाणात वॅक्सीन देण्यात आले होते. या सर्व 108 लोकांना वुहान स्पेशल सर्विस हेल्थ सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे.

या सर्व लोकांना वेगवेगळ्या दिवशी वॉक्सीन देण्यात आले, त्यामुळे सर्व लोकांना क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण होईपर्यंत तेथेच राहायचे आहे. म्हणजेच काही आठवड्यानंतर हे लोक आपापल्या घरी परत जाऊ शकतील.

ज्या 14 लोकांना घरी पाठवण्यात आले. आता त्यांना पुढील 6 महिने वैद्यकीय देखभालीत ठेवण्यात येईल, त्यांची रोज वैद्यकीय चाचणी होईल. या 6 महिन्यात हे पाहिले जाईल की यांना जर पुन्हा कोरोना व्हायरसचे संक्रमण झाले तर त्यांचे शरीर कसे प्रतिक्रिया देईल.

त्यांच्या शरीरात कोरोना व्हायरसशी लढण्याची क्षमता विकासित होईल तसे त्यांच्या शरीरात अॅंटीबॉडी तयार होतील. त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन वॅक्सीन बाजारात आणले जातील.

चेन वी यांनी सांगितले की, आमचे पहिले ट्रायल यशस्वी झाले आहे. आम्हाला जसे की व्हायरसच्या शक्तीची माहिती मिळेल, आम्ही हे वॉक्सीन आंतरराष्ट्रीय स्तरावर करार करुन जगभरात पाठवू. आम्हाला वाटते की कोरोना व्हायरसचा उपचार जगभरात पोहोचावा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like