Fish Production India | मत्स्य उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक

नवी दिल्ली : Fish Production India | भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक (Fish Production India) देश आहे. जागतिक मत्स्योत्पादनात (World Fish Production) भारताचा सुमारे 8 टक्के वाटा असल्याची माहिती केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला (Union Minister Parshottam Rupala) यांनी दिली.

देशात मत्स्य व्यवसायाने 2.8 कोटींहून अधिक मच्छीमार आणि मत्स्य पालकांना (Fish Production India) प्राथमिक स्तरावर उपजीविका, रोजगार आणि उद्योजकता प्रदान केल्याचे मंत्री रुपाला यांनी सांगितले. मत्स्यव्यवसाय विभागाच्या (Department Of Fisheries) मागील 9 वर्षातील महत्त्वपूर्ण कामगिरीचा आढावा मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते.

मंत्री पुरुषोत्तम रुपाला म्हणाले, मत्स्यव्यवसाय क्षेत्र उच्च परतावा देखील देते. जागतिक मत्स्योत्पादनात सुमारे 8 टक्के वाटा असलेला भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश (Producing Countries) आहे. गेल्या नऊ वर्षात भारत सरकारने मत्स्यपालन, मत्स्यसंवर्धन क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि मत्स्य पालक आणि मत्स्य शेती करणाऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी परिवर्तनकारक उपक्रम हाती घेतला आहे.

मागील 9 वर्षांमध्ये केंद्र सरकारने (Central Government) मत्स्यपालन आणि मत्स्य संवर्धन क्षेत्रात गुंतवणूक (Investment) वाढवली आहे. 2015 पासून सरकारने 38,572 कोटी रुपयांच्या एकत्रित गुंतवणुकीला मान्यता दिली. मागील 9 वर्षांत विक्रमी मत्स्य उत्पादन झाले. देशाचे वार्षिक मत्स्य उत्पादन 95.79 लाख टन (2013-14 अखेर) वरुन 162.48 लाख टन (2021-22 च्या शेवटी) पर्यंत वाढले आहे. अर्थात जवळपास 66.69 लाख टनांची वाढ नोंदवली गेली आहे. तसेच 2022-23 मध्ये राष्ट्रीय मत्स्य उत्पादन 2013-14 च्या तुलनेत 81 टक्के वाढ नोंदवत 174 लाख टनापर्यंत (तात्पुरते आकडे) पोहोचणे अथवा त्याहून जादा होणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title : Fish Production India | fish production india eight percent share in global fish production says minister purushottam rupala

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा