जीममध्ये जाण्याऐवजी घरातच फक्त 10 मिनीटे करा ‘हा’ व्यायाम, वेगानं वजन होईल कमी आणि शरीर होणार ‘टोन्ड’

पोलीसनामा ऑनलाइन – जिने चढणे सोपी आणि अतिशय लाभदायक एक्सरसाइज आहे. कोरोना व्हायरसमुळे जिम बंद आहेत, अशावेळी आपल्या फिटनेससाठी तुम्ही जिने चढण्याचा पर्याय निवडू शकता. नियमित केवळ 10 ते 15 मिनिटे जिने चढणे आणि उतरण्याचा व्यायाम केल्यास अनेक लाभ होतात. हे फायदे कोणते आहेत ते जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे

1 वेगाने घटते वजन
जॉगींगच्या तुलनेत जिने चढण्याने कॅलरीज वेगाने बर्न होतात. अर्धा तास जॉगिंग केल्यास अवघ्या 190 कॅलरी बर्न होतात. तर 30 मिनिटे जिने चढणे-उतरण्याने 220 कॅलरी बर्न होतात.

2 निरोगी आणि तरूण हृदय
रोज केवळ 7 मिनिटे चढण चढल्यास येत्या 10 वर्षापर्यंत हृदय निरोगी राहील. यामुळे हृदय दुरुस्तीसह वेगाने कॅलरीसुद्धा बर्न होतात. रोज जॉगिंग आणि एक्सरसाइजच्या तुलनेत चढण चढणे लाभदायक ठरते.

3 वाढतो स्टॅमिना
जिने चढताना किंवा उतरतान थोडा थकवा, श्वास किंवा धाप लागणे आणि पाय दुखणे असे होऊ शकते, परंतु यामुळे स्टॅमिना वाढतो. परंतु, हे लक्षात ठेवा जेव्हा चढण चढाल तेव्हा हळूहळू चढा, तोंड बंद ठेवा.

4 डायबिटीजमध्ये लाभदायक
डायबिटीजच्या रूग्णांनी रोज जिने चढ-उतार केल्यास रक्तातील शर्करा नियंत्रणात राहते, तसेच फुफ्फुसांचे आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.