झेंडा हटला, उरलं केवळ इंजिन, मनसेच्या नव्या झेंड्याचे ‘अनावरण’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेच्या कार्यकर्त्यांना नवी दिशा देण्याचे सुतोवाच पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. त्यांनी आपल्या पक्षाच्या झेंडा बदलण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या झेंड्यातील भगवा रंग नजरेत भरणारा असून महाअधिवेशनाकरिता लावलेली पोस्टर्स राज ठाकरे यांच्या नव्या महाराष्ट्र धर्माचे संकेत देत आहेत. आता मनसेच्या अधिकृत फेसबुक पेज आणि ट्विटरवरूनही मनसेचा झेंडा गायब झाला आहे. केवळ इंजिनाचा फोटो या दोन्ही प्रोफाईलवर दिसत आहे.

राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घ्यावी का ? लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप व मनसे यांनी परस्परांवर बरीच चिखलफेक केली. त्यामुळे आता शिवसेनेने साथ सोडल्याने भाजप-मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा असून भाजपसोबत मनसेचे सूर जुळतील का ? अशा अनेक प्रश्नांवर दोन्ही पक्षातील स्थानिक नेते आणि नागरिक चर्चा करताना दिसत आहेत. मात्र, याच पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी येत्या 23 जानेवारीला होणाऱ्या महाअधिवेशनाची जय्यत तयारी केली आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून पक्षाचा जुना झेंडा गायब झाला आहे. यापूर्वी चार रंगाच्या झेंड्यावर रेल्वे इंजिनचे चिन्ह होते. मात्र, आता फक्त इंजिनच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मनसेच्या झेंडाबदलाचे जवळपास निश्चित झाल्याचे दिसून येत आहे. आता 23 तारखेला मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण होईल अशी चर्चा असून हा झेंडा कशा प्रकारचा असेल यावर चर्चा रंगताना पहायला मिळत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –