केरळसाठी पुण्यातून पिण्याचे पाणी घेऊन रेल्वे जाणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूरामुळे तेथे पिण्याच्या शुद्ध पाण्याची कमरता निर्माण झाली असून तेथील पूरग्रस्तांना शुद्ध पाणी घेऊन एक २ डब्यांची गाडी आज दुपारी पुण्याहून रवाना होत आहे.

पुण्यातील घोरपडी येथील कोचिंग कॉम्प्लेस मध्ये सध्या १४ वॅगनमध्ये पाणी भरण्याचे काम सुरु आहे. ते ११ वाजता पूर्ण होण्याची शक्यता आहे. रतलाम येऊन एक १५ वॅगनची गाडी पुण्यात दुपारी एक वाजेपर्यंत येत असून त्यानंतर पुण्यातील १४ वॅगन आणि रतलामचे १५ वॅगन अशी २९ वॅगनची संपूर्ण गाडी दुपारी २ वाजता केरळकडे रवाना होणार आहे.

[amazon_link asins=’B078YQFXFR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’96df168d-a2ab-11e8-99ec-a9292bd6c664′]

पुण्यात  रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांनी शुक्रवारी रात्रीपासूनच वॅगनमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी अग्निशामक दलाची मदतही घेण्यात येत आहे. एका वॅगनमध्ये ५० हजार लिटर पाणी भरण्यात येत असून एका गाडीद्वारे ७ लाख लिटर पाणी पोहचविण्यात येत आहे.