… म्हणून इतर राज्यांप्रमाणे भाजपला महाराष्ट्रात ‘जुगाड’ करता आलं नाही ? फडणवीसांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने विरोधी पक्षाशी हात मिळवणी केली आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपत घेतली. आणि सर्वात मोठा पक्ष असून देखील भाजपला विरोधात बसावे लागले. उद्धव ठाकरे हे मी बाळासाहेबांना शिवसेनेचा मुख्यमंत्री करेल असे वचन दिल्याचे सांगत होते मात्र आम्हाला कधीही वाटले नव्हते की उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने मुख्यमंत्री करतील असा खोचक टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे.

भाजपचे केंद्रीय नेतृत्व इतक्या सहज महाराष्ट्रासारखे राज्य आपल्या हातातून जाऊन देईल असे कोणालाही वाटले नव्हते. गोव्या सारख्या छोट्या राज्यात सत्तेसाठी जुगाड करणाऱ्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्राची सत्ता कशी गमावली असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला होता यावर बोलताना शिवसेना कधीही काँग्रेस सोबत जाणार नाही असा आमचा अती आत्मविश्वास होता असा टोला फडणवीसांनी यावेळी शिवसेनेला लगावला आहे, तसेच शिवसेना ही त्यांच्या आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात जाऊन निर्णय घेईल असे आम्हाला बिल्कुलही वाटले नव्हते असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

एवढेच काय पण काँग्रेस देखील शिवसेनेसोबत जाणार नाही असे आम्हाला वाटले होते त्यामुळे वेळ लागतोय पण आम्ही आमच्यातल्या गोष्टी स्पष्ट करू असे आम्हाला वाटत होते मात्र नंतर तीनही पक्षांच्या चर्चा सुरु झाल्या तेव्हा आमच्या लक्षात आले की, शिवसेनेने बाळासाहेबांचे विचार गुंडाळून बाजूला टाकत आपला मुख्यमंत्री बनवायचा निर्णय घेतला आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

केंद्रीय नेतृत्व आमच्या पाठीशी होते
या सर्व घडामोडी सुरु असताना केंद्रीय नेतृत्व पूर्ण ताकदीनिशी आमच्या पाठीशी होते मात्र आम्हाला वाटत नव्हते की शिवसेना सत्तेसाठी काँग्रेस सोबत जाईल असा उल्लेख वारंवार करत फडणवीस यांनी शिवसेनेच्या निर्णयाची खिल्ली उडवली. तसेच शिवसेनेशी आपण लोकसभेला युती केली होती म्हणून विधानसभेलाही ही युती करायला हवी अशी धारणा केंद्रीय नेतृत्वाचीच होती असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.आम्ही वेडे ठरलो की आम्हाला वाटले ते आमच्या सोबत आहेत आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा करत राहिलो मात्र त्यांनी वेगळा निर्णय घेतला असे स्पष्ट मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/