भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे प्रचंड अडचणीत, फसवणुकीचा FIR नोंदविण्याचा आदेश

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – केजच्या प्रथमवर्ग न्यायालयानं भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांचे पती डॉ. विजय प्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदणीचे आदेश दिले आहेत. दरम्यान या आदेशाच्या विरोधात ठोंबरे दाम्पत्याने अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र हा आदेश कायम ठेवण्यात यावा असे सांगितले आहे.

लहुरी येथे स्थापन केलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या संचालक पदावर नकली स्वाक्षरीच्या आधारे नेमणूक केल्याच्या कथित संचालक गणपती कांबळे यांच्या फिर्यादीवरून ठोंबरे दाम्पत्याविरोधात फसवणुक आणि इतर गुन्ह्यांची नोंद करून चौकशीचे अहवाल सादर करण्याचे केज न्यायालयानं आदेश दिले होते. या सहकारी सूतगिरणीच्या मुख्य प्रवर्तक संगीत ठोंबरे असून डॉ. विजय प्रकाश ठोंबरे हे या सूतगिरणीचे अध्यक्ष आहेत. मात्र या सूतगिरणीचे संचालक गणपती कांबळे यांच्या नकली स्वाक्षऱ्या करून संचालक पदावर नियुक्ती केल्याची तक्रार त्यांनी न्यायालयात केली होती. तसेच शासनाचीही फसवणूक करण्यात आल्याचा आरोप कांबळे यांनी केला होता.

या प्रकरणामुळे भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या अडचणीत वाढ झाली असून केज न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते आणि तेच आदेश अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयानं कायम ठेवले आहेत. त्यामुळे ठोंबरे दाम्पत्याची चांगलीच कोंडी झालेली दिसत आहे. दरम्यान ठोंबरे दाम्पत्याने लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीची नोंद करताना बनावट प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव प्रादेशिक उपसंचालक वस्त्रोद्योग औरंगाबाद व संचालक वस्त्रोद्योग नागपूर यांच्याकडे दाखल केला गेला.