Former CM Kamal Nath | काँग्रेस नेते कमलनाथ यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ (Kamalnath) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमलनाथ Kamalnath यांना ताप आला होता. त्यामुळे ते बुधवारी (दि. 9) सकाळी रुग्णालयात दाखल झाले आहेत. याठिकाणी त्यांच्यावर डॉक्टरांचा निगराणीखाली उपचार सुरु आहेत.

काही दिवसापूर्वी कमलनाथ Kamalnath मध्य प्रदेशातील इंदूर येथील खासगी रुग्णालयात लिफ्ट पडण्याच्या अपघातातून बचावले होते. त्यावेळी अपघाताच्या परिणामामुळे घाबरल्याने त्यांची तब्येत ढासळली होती. त्यानंतर रुग्णालयातच त्यांचा रक्तदाब तपासला होता. हा अपघात झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कमलनाथ Kamalnath यांच्या प्रकृतीबाबत फोन करून चौकशी केली होती. कोरोना काळात कमलनाथ सक्रिय आहेत. या दरम्यान त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्रात अनेक मंत्रालयाचा पदभार सांभाळलेले कमलनाथ 2018 मध्ये मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. मात्र, कॉंग्रेसमधील बंडखोरीनंतर एका वर्षातच कॉंग्रेसचे सरकार पडले. त्यानंतर भाजपने सरकार स्थापन केले.

Also Read This : 

Petrol-Diesel Price Today : विक्रमी पातळीवर पोहचले पेट्रोल-डिझेल, मुंबईत 102 रुपये लीटरच्या जवळ, जाणून घ्या पुण्यासह इतर शहरातील दर

त्वचा-आरोग्य आणि प्रतिकारशक्तीसाठी रामबाण उपाय आहे टोमॅटोचा रस; ‘या’ पध्दतीनं बनवा, मिळतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या

अ‍ॅपवर 15 दिवसात पैसे ‘डबल’ होण्याचे आमिष दाखवून 250 कोटींची फसवणूक, 50 लाख लोकांना ‘गंडा’

फाटलेल्या टाचा काही दिवसातच होतील ‘मुलायम’, वापरा हे DIY Foot Mask

Pune Crime News : कोंढव्यात गुन्हेगारांचा तलवारीसह धुडगुस !जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावून हॉस्पिटलची फोडली काच , बाहुबली तलवारीने हफ्ता वसुलीसाठी ‘दहशत’

Wab Title : former cm kamalnath admitted to hospital